अकलूज । शंकरराव मोहिते महाविद्यालयात कोरोना बाबत जनजागृती अभियान
भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली असून या पार्श्वभूमीवर यूजीसी नवी दिल्ली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना विषाणू संसर्ग जागृती अभियान फलकाचे अनावरण शंकराव मोहिते महाविद्यालयामध्ये करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, डॉ. दत्तात्रय बागडे, डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. विश्वनाथ आवड प्रा. रविराज सोनवणे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर ताटे, डॉ.चंकेश्वर लोंढे, प्रा. दादासाहेब कोकाटे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी आपले मार्गदर्शनात कोरोना विषाणू आजाराची लक्षणे, सर्वांनी गंभीर अशा विषाणूची लागण होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसन संस्थेचे विकार असणार्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, हात वारंवार धुणे, हात धुताना सॅनीटायझर किंवा लिक्विड एन्टीसेप्टीक साबण वापरावा. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरावा. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावा. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. याविषयी मार्गदर्शन केले. सर्वांनी काळजी घ्या व जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा असे आवाहन यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी कोरोना - घाबरू नका पण काळजी घ्या. या संदर्भातील माहिती पत्रक उपस्थित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपण राहत असलेल्या परिसरातील लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक किरण भांगे यांनी केले. सूत्रसंचालन नागनाथ साळवे यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रशेखर ताटे यांनी मानले.
No comments